यंदाचा युवा महोत्सव कुठे पडणार पार काय असतील नवीन नियम, कोणते असतील नवीन कालाप्रकार . - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

यंदाचा युवा महोत्सव कुठे पडणार पार काय असतील नवीन नियम, कोणते असतील नवीन कालाप्रकार .

           


                  सोलापूर:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा मोहत्सव सप्टेंबर मध्ये स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.

     विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी विद्यापीठातर्फे युवा मोहत्सव आयोजीत केला जातो.


               संगीत कला नाट्य ललित कला व वाड:मय या अंतर्गत एकूण 27  कला प्रकाराचे सादरीकरण युवा महोत्सवात केले जाते.

       गतवर्षी कथाकथन,काव्यवाचन विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना व सृजनशीलतेला वाव मिळवा हा त्यामागील हेतू असतो.


           यंदाच्या युवा मोहत्सवाचे यजमान पद डॉ. बी.पी.रोंगे यांच्या स्वेरी अभियांत्रिकी माविद्यालयाने स्वीकारले आहे.त्याठिकाणी चार दिवस हा युवा महोत्सव रंगणार आहे.

या मोहत्सवा साठी विद्यापिठाकडून 12 लाख रुपये दिले जातात.त्यातून स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.सध्या मोहत्सवाच्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी तयारी सुरू केली आहे.


राजभवना तर्फे आयोजित इंद्रधनुष्य व भारतीय पश्चिम विभागीय व राष्ट्रीय युवा मोहत्सवात (एआईयु ) समाविष्ट कला प्रकारांचाही विद्यापिठाच्या युवा मोहत्सवात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

        जेणेकरून भविष्यात राज्य,राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावणे सोयीचे होईल हा त्यामागील हेतू आहे.कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांच्या अंतिम मान्यतेनंतर कोणते कलाप्रकार वाढतील,हे निश्चित होणार आहे.


               विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या सोयीनुसार युवा महोत्सव ची तारीख अंतिम केली जाणार आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीत हा महोत्सव सुरू करण्याचे नियोजन सुरू असून महोत्सव चार दिवस चालणार आहे. सोयरी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची व महोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे.

                जास्तीत जास्त महाविद्यालयाने या महोत्सवात सहभागी व्हावे, जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळेल असे आव्हान कुलगुरूंनी केले आहे. (स्त्रोत:सकाळ)

           यंदाचा युवा महोत्सव पंढरपूर येथील श्री अभिनेत्री महाविद्यालयात होणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठांशी संलग्नित सर्व महाविद्यालयाने तयारी करावी आणि विद्यार्थ्यांना महोत्सवात पाठवावे:- डॉ रजनीश कामत,प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.


test banner