श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे कार्यरत असलेले शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ राजनीश कामत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी,प्र- कुलगुरू गौतम कांबळे,एव्हररेस्टवीर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,कुलसचिव योगिनी घारे,क्रीडा सिनेट सदस्य प्रा सचिन गायकवाड,क्रीडा व शारीरिक संचालक डॉ केदारनाथ काळवणे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एन बी पवार उपस्थित होते.
प्रा जोरवर यांचे महाविद्यालयात वरिष्ठ विभागातील अनेक खेळाडूंना मार्गदर्शन लाभत असुन विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक खेळाडू चमकलेले आहेत म्हणूनच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा जोरवर यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले श्री संत दामाजी महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक तसेच जिमखाना विभागाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे प्रा जोरवर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रतनचंद शहा बॅंकेचे चेअरमन राहुल शहा,संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव किसनराव गवळी,अॅड रमेश जोशी,यादव आवळेकर,डॉ मोहन कुलकर्णी,डॉ अशोक सुरवसे,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,क्रीडा शिक्षक प्रा विजय दत्तू यांचेसह सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.