मंगळवेढा : आज सकाळी साधारणतः 6.45 सुमारास चंद्रकांत सोनगे हे नियमित प्रमाने मॉर्निंग वॉकसाठी सायकल वरती जाऊन माघारी येत असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिलीअसता त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मूळचे ते सिद्धापुरचे असून मंगळवेढा इथे ते स्थायिक झाले होते. मॉर्निंग वॉक गेले असता त्यांच्या सायकलीला अज्ञान वाहनाने धडक दिल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.मंगळवेढा पासून सोलापूर रस्त्यावरील थोड्या अंतरावर अशी धक्कादायक घटना घडली आहे.