अभिजित पाटील यांचा मंगळवेढा तालुक्यात गावभेट व जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

रविवार, ३० जुलै, २०२३

अभिजित पाटील यांचा मंगळवेढा तालुक्यात गावभेट व जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात.

 विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सध्या मंगळवेढा येथे मोठ्या प्रमाणात लोकसंपर्क जनसंपर्क वाढण्यास सुरुवात केली आहे.अभिजित पाटील हे गावोगावी जात प्रत्येकाच्या सुखा दुःखात हजर राहत असताना दिसत आहेत.


      काल खुपसंगी इथे हिंदू मुस्लिमाचा पवित्र असणारा सन मोहरम निमित्त त्यांनी हजेरी लावली असता.गावकऱ्यांनी त्यांच्यावर जेसीबी तून पुष्पवृष्टी करून हलगीनादात जोरदार स्वागत केले.


      मंगळवेढा तालुक्यात अभिजित पाटील यांनी गावभेट दौरा करून जनसंपर्क वाढवत आहेत.आगामी येणारी विधानसभेची तयारी मोठ्ठ्या प्रमाणात सुरू असल्याचे तालुक्यातील चर्चेद्वारे बोलले जात आहे.