वारी परिवार सामाजिक संस्थेस वृंदावन कृषी भूषण पुरस्कार जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

वारी परिवार सामाजिक संस्थेस वृंदावन कृषी भूषण पुरस्कार जाहीर.

         


        मंगळवेढा :वृंदावन फाउंडेशन व राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्र पुणे यांच्यावतीने सन 2023 चा पर्यावरण रक्षणासाठी दिला जाणारा वृंदावन कृषी भूषण पुरस्कार वारी परिवार मंगळवेढा या सामाजिक संस्थेस जाहीर करण्यात आला आहे.

           सदर पुरस्काराची घोषणा श्री.सचिन पाटील,प्रा.डा‍ॅ.माणिकराव सोनवणे यांनी केली पुणे येथे होणारा पुरस्कार वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विचारवंत मा रवींद्रजी शिंगणापूरकर यांच्या शुभहस्ते  व ज्येष्ठ पर्यावरणवादी ह भ प शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार ६ ऑगस्ट २०२३  सकाळी १० वा भाविसा सभागृह सदाशिव पेठ  पुणे येथे संपन्न होत आहे.

           पर्यावरण जागृती व वृक्ष लागवड संवर्धन,कृषी जागर प्रबोधन कार्यात  दिलेले योगदान यामध्ये प्रामुख्याने ज्वारी मका परिषद,मंगळवेढा पंढरपूर कृषी जागर दिंडी,डाळिंब परिषद तसेच मंगळवेढा पंढरपूर हरित पालखी महामार्गावर लावलेली नऊ हजार झाडे  व मंगळवेढा स्मशानभूमी,डीवायएसपी ऑफिस परिसर,मंगळवेढा पोलीस स्टेशन परिसर येथे लावलेली झाडे व त्यांचे संवर्धन या योगदानाबद्दल वारी परिवारास वृंदावन कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.