मंगळवेढा(प्रतिनिधी) अजित पवारांनी नगर जामखेडचा जगदंबा कारखाना ताब्यात घेतला, नुकतच समजले आहे त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सुद्धा घेतला आहे ,आता त्यांचा डोळा विठ्ठल कारखान्यावर आहे या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास याच मुळे उशीर झाला त्यांना उमेदवारी पार्थ पवार यांना द्यायची होती मात्र ते जमले नाही, शेवटी विठ्ठल कारखाना अवसायनात काढायचा आणि तो आपल्या ताब्यात घ्यायचा हा डाव अजित पवारांचा असल्याचा आरोप माजी मंत्री रामाशिंदे यांनी केला. ते मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीभारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गणेश वाडी शेलेवाडी डोंगरगाव अकोला गुंजेगाव ममदाबाद या प्रचार सभेत बोलत होते. समाधान आवताडे म्हणाले की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. महा विकास आघाडीने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे काम केले पाणी हे आग विझविण्याचे काम करते परंतु येथील पाणी राजकारणाची आग भडकावण्याचे काम करते आरोग्य शैक्षणिक वाडीवस्ती रस्ता पाणी समस्या आहेत पण गेली अकरा वर्षे तुम्ही काय केले? गरजू लोकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता विक्रमी निधी दिला.या मातीतील ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे एम आय डी सी ची जागा सौरऊर्जेला दिली.मत रुपी आशीर्वाद द्या.
आ.सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, ही निवडणूक विरोधक केवळ सहानुभूतीच्या आधारे लढवली जात नाही तर कर्तृत्वावर लढवली जाते, त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत, समाधान आवताडे हे कर्तृत्ववान, विकसनशील नेतृत्व आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. रोज एक मंत्री घरी जातोय, भ्रष्टाचारात नवी नावे समोर येताहेत त्यामुळे या सत्तेला सुरुंग लागला असून काउंटडाऊन सुरू झाले आहे या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता बदल पक्का असल्याचा विश्वास आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.
या प्रचारदौऱ्यातभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे,रयत क्रांतीचे पक्षप्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत,सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक जाधव, माळशिरस तालुक्याचे आ.राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण,दुध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे, नंदकुमार हावनाळे, मिस्टर पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मस्के,प्रा.येताळ भगत सर,भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिन्द्र भोसले, दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांची होती..