"साखर कारखान्याची वाट लावणाऱ्यांचा पराभव करा"-शैलाताई गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

"साखर कारखान्याची वाट लावणाऱ्यांचा पराभव करा"-शैलाताई गोडसे


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील साखर कारखाना ,श्री विठ्ठल साखर कारखाना ,तसेच श्री संत दामाजी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याचे चेअरमन आज आमदार होऊ पहात आहेत. या दोन्हीचेअरमन नी, या दोन्ही दादांनी साखर कारखान्याची वाट लावली आहे. एका दादांनी शेतकऱ्या चे ऊस बिल थकित ठेवले आणि दुसऱ्या दादाने कामगाराचे पगार थकित ठेवले .कामगाराला त्याच्या हक्काची कष्टाची कमाई न देणाऱ्या या दोन्ही साखर कारखानदारांना

 आज जनतेने जाब विचारण्याची वेळ आलेली आहे.

पस्तीस गावाला पाणीटंचाई ही गेली कित्येक वर्षापासून जाणवत आहे. या 35 गावच्या पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत दहा वर्ष आमदारकी करणारे हे लोकप्रतिनिधी तसेच भूमिपुत्र आज या 35 गावच्या पाण्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिरनांदगी या बंधाऱ्यात मी उतरून पाण्यासाठी मी आंदोलन केले. त्यावेळी माझ्याकडे कुठलेही राजकीय पद नसताना फक्त जिल्हा परिषदेचे सदस्यत्व असताना मी म्हैसाळ योजनेमध्ये आठ गावांचा समावेश केला. पाण्यासाठी आंदोलन केले. या दोन्ही दादाने शेतकऱ्यांच्या  पाणीप्रश्‍नासाठी कधी आंदोलन केले का? हे जनतेने जरूर विचारावे .संत दामाजी साखर कारखान्यातील 19000 ऊस उत्पादक सभासदांचे सभासदत्व रद्द केले. त्यांना कारण सांगण्यात आले की तुम्ही ऊस पीक घेत नाही. तुमचा ऊस कारखान्याला येत नाही. म्हणून तुमचं सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. अरे या शेतकऱ्यांना उसाच्या पिकाला पाणी मिळत नाही. त्या पाण्यासाठी पुढारी भांडत नाही. कसा 

 शेतकरी ऊस कारखान्याला आणून घालणार आहे .या दोन्ही साखर कारखानदारांनी स्वतःला

 दादा म्हणून घेत साखर कारखान्याची वाट लावलेली आहे. अशा दोन्ही साखर कारखानदारांना येत्या 17 तारखेला पराभूत करण्याची वेळ आलेली आहे. मतदार बंधू-भगिनींना ही सुवर्णसंधी लाभलेली आहे .आपल्या मताचा हक्क बजावून शिट्टी या माझ्या निवडणूक चिन्ह समोरील बटन दाबून मला विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध विकास कामे करण्यासाठी मला फक्त एकच वेळ संधी द्या. असे आवाहन शैलाताई गोडसे यांनी खुपसंगी या गावी मतदार बंधूंना केले.

test banner