विठ्ठल व दामाजी या दोन्ही कारखाने च्या चेअरमनवर अंकुश ठेवण्यासाठी एकदा संधी द्या-शैलाताई गोडसे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

विठ्ठल व दामाजी या दोन्ही कारखाने च्या चेअरमनवर अंकुश ठेवण्यासाठी एकदा संधी द्या-शैलाताई गोडसे

 


मंगळवेढा(प्रतिप्रति) पंढरपूर.. मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी,रहाटेवाडी, ताम दर्डी गावीआपल्या प्रचार सभेत बोलताना सौ.शैलाताई गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना त्या पुढे म्हणाल्या पंढरपूर म़ंगळवेढा मतदारसंघात दोन साखर कारखाने असून प्रत्येक साखर कारखान्याचा चेअरमन हा सभासदांच्या जीवावर स्वःताला.आमदार समजू लागतो.ऊस उत्पादक शेतकरी बांधवाचे ऊसाचे बील थकवणारे,कामगारांचे वेतन बुडवणाऱ्या या साखर कारखान्याच्या चेअरमनांवर अंकुश ठेवण्यासाठी, शेतकरी बंधूंच्या व तसेच कामगार बंधूंच्या उसाचे बिल तसेच थकित वेतन मिळवून देण्यासाठी एक वेळ मला विधानसभेमध्ये जाण्याचे संधीचं जनतेनी द्यावी द्यावी.

     मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव या गावांना पाणी मिळवून देऊ असे म्हणून गेली विधानसभेचे तीन पंचवार्षिक आमदार म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवाराने अजूनही कित्येक गावांमध्ये पाण्याची सोय केलेली नाही. मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमधून उमदी या जत तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील या गावी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो,पाणी दिले जाऊ  शकते. परंतु मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. मैसाळ योजनेमध्ये आठ गावांचा समावेश मी शासन दरबारी जिल्हा परिषद सदस्य असताना या आठ गावांचा मी म्हैसाळ प्रकल्प योजनेत समावेश केला. मी आमदार नसताना देखील जनतेसाठी मी अशी विकास कामे करू शकते. परंतु जिल्हा परिषद सदस्य या नात्याने विकास काम करीत असताना काही वेळा मर्यादा येते.विकास कार्याला मर्यादा पडू शकतात. याची जाणीव मला झाल्यामुळे मी विधानसभेमध्ये आमदार होऊन जाण्यासाठी जनतेकडे मी एक वेळ संधी मागत आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, दोन्ही तालुक्यांचा कायापालट करण्यासाठी, महिला भगिनींना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी विविध घरोपोयोगी लघु उद्योग असे छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी शासन दरबारी बेरोजगार, शेतकरी, ऊस उत्पादक, कष्टकरी महिला यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी आपण जनतेने द्यावी. असे आवाहन आपल्या प्रचार सभेमध्ये शैलाताई गोडसे यांनी जनतेला केले.

    शैला गोडसे यांना ग्रामीण भागांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावांमधील घरोघरी जाऊन शैलाताई गोडसे या मतदार बंधू-भगिनींना आपली निवडणूक चिन्ह शिट्टी या शिट्टीच्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे. असे आवाहन सौ. शैलाताई करीत होत्या.सौ. शैलाताई गोडसे यांच्या प्रचार सभे ला प्रचंड गर्दी होत आहे.

test banner