राज्यातील परिवर्तनाला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून सुरुवात-प्रशांत परिचारक दोन तारखेला मतदारसंघात कमळ फुलणार आणि राज्यातील सरकार जाणार हे वाक्य लिहून ठेवा - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

राज्यातील परिवर्तनाला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून सुरुवात-प्रशांत परिचारक दोन तारखेला मतदारसंघात कमळ फुलणार आणि राज्यातील सरकार जाणार हे वाक्य लिहून ठेवा


 मंगळवेढा(प्रतिनिधी ) भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे या दृष्ट हेतूने शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेसनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले मात्र त्यांच्या पायगुणाने राज्यात कोरोना आला. दोन तारखेला मतदारसंघात कमळ फुलणार आणि राज्यातील सरकार जाणार हे वाक्य लिहून ठेवा असा दावा भाजप आ. प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील हुन्नूर येथे बोलताना व्यक्त केला.                                              पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ   हुन्नूर ता.मंगळवेढा येथे गावभेट दरम्यान कॉर्नर सभा ते बोलत होते.                                                                     यावेळी गोपीचंद पडोळकर,माजी राज्यमंत्री बाळाजी भेगडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,औदुंबर वाडदेकर,सोमनाथ आवताडे,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल,रयतचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर,बापू मेटकरी, जयंत साळे, लक्ष्मण जगताप,पप्पू काकेकर,सचिन शिवशरण, प्रा.येताळ भगत  दिगंबर यादव आदी उपस्थित होते.                                          जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रांजणी येथे बोलताना उपस्थित जनसमुदाय पाहताना कोरोना नाही म्हणून मी मास्क काढत आहे असा दावा केल्यानंतर त्या दाव्याचा खरपूस समाचार आ. परिचारकांनी घेत कोरोना नाही तर मग लाॅकडाऊन  कशाला केला असा सवाल उपस्थित करून 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयदादा बाहेरचे आणि मी भूमिपुत्र हा मुद्दा रेटला गेला.

 विधानसभेच्या तीन निवडणुकीतील स्व भालकेचे जनमत घसरत चालले आहे मात्र दीड लाख मतदार त्यांच्या विरोधात चालले आहे त्यामुळे ते 33 टक्के मत पडलेला उमेदवार पास होतो आणि 67 टक्के मते पडलेला उमेदवार नापास होतो त्यामुळे यापुढील काळात दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली जात आहे राज्यातील परिवर्तनाला सुरुवात या मतदारसंघातून होणार आहे त्यामुळे लोकांनी विकासाच्या दृष्टीने समाधान दादाला विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे ही लढाई महाविकास विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी आहे राज्यातील एकमेव निवडणूक असल्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता.स्व भालकेच्या पश्चात जर उमेदवारी त्यांच्या पत्नी दिली असती तर भाजपाने ही जागा बिनरोध केली असती मात्र रामायणामध्ये एका मुलाचे राज्य आईने काढल्याचे ऐकतो पण इथे मात्र आईचे राज्य मुलांने काढून घेतले मीच कसा लायक आहे दाखवत शिष्टमंडळ पाठवून काढून घेतल्याचा आरोप यावेळी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा