कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही - आ.रणजितसिंह मोहिते पाटील - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही - आ.रणजितसिंह मोहिते पाटील

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) केवळ मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर 31 तालुके आणि सहा जिल्ह्याच्या पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून समोर आलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटला जाणार नाही त्यासाठी खंबीर नेतृत्व विधानसभेत पाठवण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज च्या सभेत  सत्ता येताच केंद्रामध्ये जलसिंचन मंत्रालय स्थापन करू असे आश्वासन दिले, सत्ता आल्यानंतर लगेच त्यांनी ते मंत्रालय सुरू केले त्या मंत्रालयाचे काम सुरू झाले आहे, त्या माध्यमातून ही योजना पूर्ण करायची असून आपल्याकडे पाणी आणायचे आहे त्यासाठीच पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी समाधान आवताडे यांना विजयी करा असे आवाहन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांने केले.        

यावेळी आ.गोपीचंद पडळकर, आ.प्रशांत परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी सभापती प्रदीप खांडेकर,औदुंबर वाढदेकर, जयंत साळे,येताळा भगत रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, सोमनाथ आवताडे, कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, राजीव बाबर, आझाद दारुवाले, तानाजी जाधव,विजय बुरकुल,बाबा कोंडुभैरी ,सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


पाणीप्रश्नी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तोफ डागली. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न या निवडणुकीत ही गाजतो आहे, मात्र म्हैसाळ या योजनेसाठी 1995 साली युतीचे सरकार असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी निधी दिला, त्यानंतर 15 वर्ष आघाडीच्या सरकारने दमडा रुपया ही दिला नाही मात्र 2014 साली आलेल्या फडणवीस सरकारने निधी दिला मग काय दिले काँग्रेस राष्ट्रवादीने ? त्यांना पाण्यावर राजकारण करायचे होते त्यांनी केले. 11 वर्ष आमदार असणाऱ्यांनी एक तर योजना आणली का? किती कामे केली? यांना मते मागण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे विचार करून मतदान करा असे शशिकांत चव्हाण म्हणाले.रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले हे बोलताना म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ जंगलगी या आयोजित प्रचार सभेत बोलत होते,  2009 ला जर विजयसिंह मोहिते पाटील यांना निवडून दिले असते तर पाण्याचा प्रश्न कधीच सुटला असता, मात्र लबाड, खोटे आश्वासन दिलेल्या माणसाला तुम्ही बळी पडला,  मी पंढरपूर तालुक्यातील सारकोली गावचा सुपुत्र आहे, विठ्ठल कारखाना कधी काळी 40 कोटींच्या ठेवी होत्या पण आता 600 कोटीचे कर्ज भालके यांनी केले, आता पोटनिवडणूक लागली आहे, त्यांच्या पोराला तिकीट दिलंय, बापाच्या वेशात पोरगा फिरत आहे, तुमच्याकडे येईल, मत मागेल तुझ्या बापानं काय केलं तू काय करणार असे सांगून त्याला सारकोलीला परत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.


test banner