महिला दिनानिमित्त खुल्या व अंतर्गत स्पर्धेचे प्रायमा तर्फे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

महिला दिनानिमित्त खुल्या व अंतर्गत स्पर्धेचे प्रायमा तर्फे आयोजन.मंगळवेढा - येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालया तर्फे मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील महिलांच्या करिता ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून खुल्या व अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रायमा संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार यांनी दिली.

 आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वैशाली कुंभार म्हणाल्या की, प्रायमा तर्फे यावर्षी प्रथमच खुल्या स्पर्धेचे आयोजन केलेले असून यामध्ये निबंध व वेशभूषा या खुल्या स्पर्धा असून निबंध स्पर्धेचे विषय १) बालपण हरवते जेव्हा २) समाजातील हरवलेले पोस्ट कार्ड हे आहेत. निबंध स्पर्धेच्या दिवशी प्रायमा प्रत्यक्षात येऊन लिहावे लागणार आहेत. तर वेशभूषा ही ऐतिहासिक असणार आहे.

 तर प्रायमा मधील प्रवेशित माता पालक यांच्याकरिता १) बादलीतील वाटीमध्ये नाणे टाकणे, २) पालक आणि विद्यार्थी यांनी फुगा फुगविणे व फुगा फोडणे, ३) स्मरण खेळ, ४) फुगा फुगविणे व फुग्याच्या हवेने ग्लास पाडणे या स्पर्धा असतील. सर्वच स्पर्धेच्या नियम व अटी स्पर्धा सुरु करण्यापूर्वी स्पर्धकांना सांगण्यात येतील, स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांना बंधनकारक राहतील.

 मंगळवेढा शहर व तालुक्यातील जास्तीतजास्त महिलांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी प्रत्येक स्पर्धेकरिता रु.१००/- शुल्क भरून नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय, खंडोबा गल्ली किंवा प्रायमा काॕम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, कुंभार गल्ली येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२० अखेर पर्यंत करावी असे प्रायमाच्या संचालिका ईशा पटवर्धन यांनी केले आहे.
test banner