मंगळवेढा – येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयास मंगळवेढा पोलिस ठाणे तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण संस्था म्हणून पोलिस निरिक्षक ज्योतिराम गुंजवटे, सौ. गुंजवटे मॅडम, आणि दक्षता समितीच्या अंजली मोरे, नगरसेविका भागिरथी नागणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मंगळवेढा पोलिस ठाणे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भिमराव मोरे यांनी प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाने मंगळवेढा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात असलेले अमुलाग्र असे बदल केलेले आहेत. याशिवाय प्रायमा नेहमीच नवनवीन गोष्टी पालकांच्या समोर आणून देते. त्याच बरोबर प्रत्येक कार्यात पालकांना देखील सहभागी करुन घेते. त्यामुळेच पालकांना प्रायमाबद्दल आकर्षण होत आहे. यामध्ये प्रायमाच्या सचिवा वैशाली कुंभार, संचालिका ईशा पटवर्धन नेहमीच प्रशालेला अद्यायावत ठेवतात म्हणून त्यांचा आदर्श शिक्षण संस्था म्हणून सन्मानपत्र गौरव करीत आहोत. प्रायमाबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. प्रायमा ही राज्यातील पहिली डिजिटल बालवाडी असून राज्यातील पहिली ISO 9001-2015 मानांकन बालवाडी, प्रायमा सर्वच परिसरात CCTV, गेली ३० वर्षे झाली मंगळवेढा शहरात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात शिवाय सिनेअभिनेते सिनेअभिनेत्री यांना दरवर्षी निमंत्रित करुन पालक वा मुलां-मुलींचा गौरव, माता पालकांची शाळा हा नाविण्यपूर्ण असा राबविला जातो. माता पालक यांना एक दिवस शिक्षिका म्हणून संधी दिली जाते. माता पालक यांच्याकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. प्रायमा ची स्वतंत्र वेबसाईट आहे. राज्यात प्रथमच इ.१०वी १२वी प्रमाणेच बालवाडीचा निकाल Online दिला जातो. राज्यात प्रथमच शाळेतील वर्षभरातील सर्वच कार्यक्रमाचे नियोजित आराखडा तयार करुन पालकांना "वार्षिक कॕलेंडर" दिले जाते. प्रायमा मधील शिक्षिकांना गणवेश, नावाची पट्टी Name Plate, प्रथमच ब्लेझर ची सुविधा देण्यात आली. यामुळेच प्रायमा ला मंगळवेढा पोलिस ठाणे तर्फे “आदर्श शिक्षण संस्था” म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयास मिळालेला “आदर्श शिक्षण संस्था” हा सन्मान प्रायमा संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार, संचालिका ईशा पटवर्धन, प्रायमाच्या शिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, सारिका चव्हाण, अश्विनी टाकणे, पूजा ढोणे, स्वाती माळी, सुनिता कुंभार, नीता डोके, गीता गुंगे, वैशाली खांडेकर, राधिका भगत, सुजाता मुदगूल, शिला पलंगे यांनी स्विकारला.
प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयास आदर्श शिक्षण संस्था म्हणून सन्मानित करण्यात आल्यामुळे पालकांनी प्रायमाच्या संचालकांचे, सर्वच शिक्षिका कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले.
मंगळवेढा पोलिस ठाणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.बी. पवार, पत्रकार ज्ञानेश्वर भगरे, शिवाजी पुजारी, मंगळवेढा पोलिस ठाणे येथील गोपनीय विभागाचे राजकुमार ढोबळे, प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार, लखन कोंडुभैरी आदी मान्यवर उपस्थित होते.