प्रायमामध्ये महिला पालकांना एक दिवस शिक्षकाची संधी हा आगळा वेगळा उपक्रम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

प्रायमामध्ये महिला पालकांना एक दिवस शिक्षकाची संधी हा आगळा वेगळा उपक्रम.



मंगळवेढा – येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय (डिजिटल बालवाडी) मंगळवेढा येथे आज शनिवार दि.१५/०२/२०२० रोजी प्रायमा मधील माता पालक यांचेकरिता एक दिवसाचे शिक्षक होण्याची संधी देण्यात आली होती. एक दिवसाचे शिक्षक म्हणजेच "महिला पालक शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी कु. स्वानंदी विशाल गायकवाड व चि. ओम शशिकांत जावळे यांचे औक्षण करुन वाढदिवस साजरा केला. कु. स्वानंदी हीने वाढदिवसानिमित्त विद्यालयातील सर्वांना पेन्सिल व खोडरबर वाटप केले.
"महिला पालक शिक्षक दिन" या दिवशी शिशु वर्गास (जाई-जुई-कमळ) सुरेखा नितिन पलुसकर, रुपाली राहूल ताड, लहान वर्गास (चाफा-चमेली-निशिगंध) या वर्गात प्राजक्ता सचिन बडोदकर, स्वाती रतिलाल आसबे, अमृता अमित जोशी, कोमल अमोल लेंडवे, सुप्रिया गजानन घारगे, सुरेखा समाधान कोळेकर, मोठा वर्गास (गुलाब-मोगरा-प्राजक्त) विद्या दिपक कोकरे, माधुरी दामाजी वाकडे, सीमा कन्हैय्या कोंडूभैरी, राणी प्रविण माळी, स्नेहल विशाल माने, सुवर्णा स्वप्निल पवार, प्रज्ञा मनोजकुमार कोळी यांनी वर्ग शिक्षिका म्हणून जबाबदारी पूर्णपणे पार पाडली.
महिला पालकांनी राष्ट्रगीत, नैमित्तिक पाठांतर, विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन, वर्गातील अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केली. महिला पालकांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, एक दिवस वर्गात शिकविण्याचा हा अनोखा अनुभव आला. आम्ही दररोज गेट पर्यन्तच मुले सोडून जातो परंतु आज वर्गात शिकविण्यास मिळाले खूप आनंद वाटला मन अगदी प्रसन्न झाले. सर्वच मुले खूपच हुशार आहेत. फलकावर लिहिल्याबरोबर लगेचच विचारण्यापूर्वीच उत्तरे देत होती. प्रायमा मधील सर्वच शिक्षिकांनी अतिशय प्रेमांनी प्रत्येक वर्गातील मुलां-मुलींच्यावर चांगले संस्कार घडविले आहेत हे आज प्रत्यक्ष वर्गात शिकविण्याची संधी मिळाल्यानंतर अनुभवास आले. वर्गात कोणीही नवीन आले तर मुले लगेचच उभारुन “गुड मॉर्निंग” म्हणतात हा ही एक संस्कारामधीलच भाग होय. खरोखरच घरातील एक मुल सांभाळणे आणि शाळेतील वेगवेगळ्या घरातून आलेली ही मुले-मुली सांभाळणे व एक सारखेच संस्कार करणे, शिकविणे हे खूपच अवघड काम आहे. प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाने आम्हांला एक दिवसाचे शिक्षक होण्याची संधी दिली त्यामुळे खूप काही शिकता आले. त्यामुळे प्रायमाचे प्रथमतः आम्ही सर्वच माता पालक आभार मानतो.
महिला पालक शिक्षक दिन यशस्वी करण्यासाठी प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार, संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार, संचालिका ईशा पटवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली प्रशालेच्या शिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, सारिका चव्हाण, अश्विनी टाकणे, पूजा ढोणे, सुनिता कुंभार, निता डोके, स्वाती माळी, गीता गुंगे, वैशाली खांडेकर, राधिका भगत, सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर, गजानन कसगावडे आणि महत्वाचा दुवा असणारे माता पालक यांनी परिश्रम घेतले.


test banner