न्याय व हक्कासाठी बहुसंख्येने शिक्षक कोल्हापूरला जाणार- संभाजीराव सुळकुंडे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

न्याय व हक्कासाठी बहुसंख्येने शिक्षक कोल्हापूरला जाणार- संभाजीराव सुळकुंडे


 मंगळवेढा(प्रतिनिधी ) कोल्हापूर नगरीमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे भव्यदिव्य महामंडळाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आधारस्थंभ माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार असून,जलसंपदामंत्री मा.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्री मा.हसन मुश्रीफ व शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड ग्रामविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे गृहराज्यमंत्री मा.सतेज पाटील व नेते संभाजीराव  थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राज्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून शिक्षक संघ राज्यात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मा.श्री. तांबारे सर यांच्या अध्यक्षतेखाली अविरत पणे कार्य करत आहे. अनेकदा शिक्षक संघाने आपल्या कार्याचा ठसा उमटावून शिक्षक हिताचे कार्य केले आहे. शिक्षक संघाचे नाव टाकून प्रशासकीय बदली प्रक्रिया बाबद शासन आदेश यापूर्वी शिक्षक संघाच्या प्रयत्नाने व मा.जयंत पाटील यांच्या आशिवार्दाने निघालेला आहे. सध्य स्थितीत शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत यामध्ये प्रामुख्याने १नोव्हेंबर २००५नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे,बदली धोरणामध्ये आवश्यक तो बदल करणे,MSCITसाठी मुदत वाढ मिळून झालेली वसुली परत मिळावी,BLOकामातून मुक्ती मिळावी,१००% मुलांना गणवेश अनुदान द्यावे,इतर कर्मचाऱ्याप्रमाणे १०-२०-३० आश्वासितप्रगती योजना लागू करावी,अवास्तव प्रशिक्षण बंद करावी,खंड२ लवकर प्रसिध्द करून ७ व्या आयोगातील त्रुटी दूर कराव्यात,न.पा.स१००% वेतन अनुदान मिळावे, सर्व शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू ठेवावी इ.सर्व रास्त मागण्या मांडून त्या येणाऱ्या काळात सोडवून घेण्यासाठी सदर महामंडळ सभेस राज्यभरातून लाखो शिक्षक येणार असून मंगळवेढा तालुक्यातूनही बहुसंख्य शिक्षक जाणार असल्याची माहिती शिक्षक नेते दामाजी शिक्षक पतसंस्थेचे व्हा. चेअरमन संभाजीराव सुळकुंडे यांनी दिली. यावेळी शिक्षक संघाचे प्रसिध्दी प्रमुख मा.नागेशकुमार धनवे,मा. किसनराव डांगे,शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख मा.श्री श्रीरंग आवळेकर,मंगेशराव मोरे,शिक्षक संघाचे मार्गदर्शक मा.श्री.अनिल गडदे,श्री.मोहनराव गांडुळे, श्री.अरविंद भुसे,समाधान पवार, विश्वास यादव,संजय भुसे,उपाध्यक्ष मा.श्री.दशरथ कोकरे,श्री.सुनिल शेजाळ,श्री.शिवाजी पोफळे, महादेव पिसे,केंद्र संघटक मा.भुजंगराव खटकाळे,व प्रवक्ते धनंजय लेंडवे हे उपस्थित होते.
test banner