राज्यातील शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू -शरद पवार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २० जानेवारी, २०२०

राज्यातील शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू -शरद पवार


 मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्यासंदर्भात येत्या महिनाभरात  राज्याचे शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री, शिक्षण खात्याचे सर्व अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचे पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन सर्व मागण्या कालबद्ध रीतीने टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील असे आश्वासन खा.शरद पवार यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री सतेज पाटील, स्थानिक आमदार, खासदार, राज्यातून आलेले शिक्षक संघाचे पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
 खा.पवार यांनी शिक्षक संघाच्या उज्वल कारकीर्दीचा उल्लेख करीत संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील. मागील पाच वर्षांमध्ये जो काही त्रास शिक्षकांना झाला तो पुढील काळात होणार नाही असे ही ते म्हणाले.
 महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी शिक्षक संघाच्या ताकदीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत संभाजी तात्या थोरात यांच्या कार्याचा गुणगौरव केला. शिक्षण मंत्री म्हणून मी सुद्धा काही काळ काम केल्यामुळे मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असे ते म्हणाले.
 शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, नगरपालिका महानगरपालिकाना शंभर टक्के अनुदान देणे, बदली जीआर मध्ये बदल करणे , बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता करणे इत्यादी महत्त्वाचे प्रश्न मंत्री महोदयांपुढे मांडले आणि या प्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. या महामंडळ सभेसाठी राज्यभरातून प्रचंड संख्येने शिक्षक बंधू -भगिनी ,शिक्षक संघाचे राज्य ,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यउपाध्यक्ष संजय चेळेकर , जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे , सरचिटणीस बब्रुवान काशीद , कार्याध्यक्ष जोतीराम बोगे, कोषाध्यक्ष आप्पासो देशमुख , संभाजी तानगावडे, रामचंद्र दोलतडे , गौतम दोडके, भारत शिंदे , सुनिल शिंदे , विजयसिंह गायकवाड यांचेसह हजारो शिक्षक संघाचे शिलेदार महामंडळ सभेला उपस्थित होते.
test banner