स्नेहसंमेलनातुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव : विष्णुपंत आवताडे
मंगळवेढा(प्रतिनिधी )मंगळवेढा येथील नूतन मराठी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहातसाजरे झाले अप्रतिम नाट्यछटा, स्टेजगीत, पर्यवरण गीत,देशभक्तीपर गीत, नाटक नक्कल , भांगडा, लावणी, नागडा सांग ढोल पर्यावरण संरक्षण गीत यासह विविध गीतामधून शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींनीच्या सादरीकरणाने मंगळवेढातील रसिकांना मंत्रमुग्ध केले स्नेहसंमेलन चा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला
कार्यक्रम चे उदघाटन दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा आर एन कुलकर्णी होते यावेळी नगरसेवक अजित जगताप, संचालक सुरेश जोशी , आप्पासाहेब महालकारी,संचालिका विनया ताम्हणकर मुख्याध्यापिका सुनीता औताडे, माध्यमिक मुख्याध्यापक गुरलिंग बंडगर, शिक्षक उपस्थित होते
या कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ६४ व ८वी ते १०चे अनेक प्रकारातील कार्यक्रम सादर केले देशभक्तीपर गीतांनी सर्वांची मने जिंकली नाट्यछटा, पर्यवरण , नाटक, नक्कल च्या सादरीकरनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील कार्यक्रम च्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली
यावेळी शिवाजी कोंडूभैरी, सुवर्णा कुलकर्णी,सिदेश्वर पवार , प्रकाश पाटील, उज्वला घोडके, संदीप माळी, सचिन घोडके, विजय मेटकरी ,गौरी कानडे,ए. टी. माळी, विद्या हुगार , ,माध्यमिक चे सुभाष गायकवाड, अवंती पटवर्धन, योगेश कुलकर्णी, जमखंडी, आर एन कुसाळकर, पाटील, सतिश कसगावडे, वैभव खांडेकर लाड,गोविंद शिंदे आदी उपस्थित होते
चौकट-- शाळा मध्ये आयोजित होणारे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना उजाळा देणारे व्यासपीठ आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्तगुण असतात ते हेरून त्याच्या विकासाला पोषक वातावरण तयार केल्यास त्याच्या कलागुणांना वाव मिळून तो कलाकार म्हणून निश्चित नावलौकिक मिळवू शकतो असे मत विष्णूपंत आवताडे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले
----------
फोटो ओळीं---- नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थी स्नेहसंमेलन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या अलौकिक कार्याविषयी नाटिका सादर करताना