युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक


युटोपियनचे शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न

 मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.कारखान्या च्या २०१९-२०२० या सहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवार दि.१४/११/२०१९ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ह.भ.प.मदन महाराज हरीदास,युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
     सुरूवातीला कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री.महेश निंबाळकर यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

     यावेळी बोलताना युटोपियन शुगर्स चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा सहावा गळीत हंगाम असून  सुरुवाती पासूनच ऊस उत्पादकांच्या हितास प्राधान्य देण्याचे काम युटोपियन शुगर्स ने केले आहे. त्यामुळेच आम्ही ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.भविष्यामध्ये या कारखान्याचा कणा असणारे ऊस उत्पादक व कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून भविष्यामध्ये अनेक लाभदायी योजना राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.मागील गळीत हंगाममध्ये ऊसाची उपलब्धता प्रचंड होती. परंतु चालू वर्षी दुष्काळी परिस्थिति असल्याने ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणावर आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर अडचणी आहेत त्यासाठी कारखाना काटकसरीने चालविणे ही काळाची गरज आहे.अशा परिस्थितीत ही युटोपियन ने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला असल्याने चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद कारखान्याचे संस्थापक-चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केला.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युटोपियन शुगर्स  चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.

फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन पूजन करताना पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प.मदन महाराज हरीदास, चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग दिसत आहे.
test banner