देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर २०१९ - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर २०१९



प्रतीनिधी सांगोला

सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १९ नोव्हेंबर २०१९  रोजी प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी लिखित " मानवतेचा मेरूमणी " या 
देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

मा. डॉ. पी.डी. पाटील साहेब , अध्यक्ष डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांच्या शुभहस्ते व मा.डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील , नटवर्या किर्ति शिलेदार व अध्यक्ष श्री.बाबुराव गायकवाड  यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

दिनांक २० / ११ /२०१९ रोजी सायंकाळी ८ वाजता भारूडकर श्रीमती चंदाताई तिवाडी यांचा भारूडचा कार्यक्रम बाजार पटांगण हनुमान मंदिरासमोर ,मेडशिंगी ता. सांगोला येथे होणार आहे.
दि.२१ /११ /२०१९  रोजी राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा ( पुरुष ) दुपारी ३ वाजता आयोजित केल्या आहेत
दि २३ / ११ /२०१९ रोजी सकाळी ८ वा खुली अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे .
दि. २४ /११/ २०१९ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे  सकाळी विविध कला गुणदर्शन स्पर्धा आयोजित केली आहे.
दि. २५ /११ / २०१९ रोजी सकाळी १० वाजता परितोषिक वितरण व सांगता समारोह होणार आहे.

देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा जन्मशताब्दी महोत्सव व २३ वा स्मृतीदिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा विद्यार्थी व नागरिकांनी आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे. 





test banner