मंगळवेढा (प्रतिनिधी):- इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती तथा ईद मिलाद निमित्त लतिबशाह ईद मिलाद जुलूस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिरात एकूण 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लतिबशाह दरगाह येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार यांच्या हस्ते व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांच्या अध्यक्षस्थानी करण्यात आले.
यावेळी उद्योजक आझाद पटेल, माजी नगरसेवक शरिफ सुतार, उद्योजक भैय्या मकानदार,लतिबशाह ईद मिलाद जुलूस कमिटीचे अध्यक्ष शहाजहान मकानदार,कै.सरजूबाई बजाज ब्लड बॅकेचे डाॅ.सदानंद पाटील व किरण धोंगडे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी,उद्योजक आझाद पटेल,माजी नगरसेवक शरिफ सुतार,बाळासाहेब थोरवत,आदींनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरास आशपाक मकानदार,गैबी मकानदार,फिरोज दारूवाले,बबलू मकानदार,अमीर मकानदार,रियाज दारूवाले,समीर मकानदार,आयाश मकानदार,फारूख मकानदार,कदीर दारूवाले,मुक्तार मकानदार,अतून मकानदार,सलीम मकानदार,टिल्लू मकानदार,लतिब मकानदार,सिंकदर दारूवाले,सद्दाम मकानदार,आशिफ मकानदार आदी परिश्रम घेतले.