राष्ट्रवादीचा पावरफुल अॅक्शन पॅक नेता अजितदादा पवार यांची मंगळवेढ्यात गुरुवारी प्रचार सभा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादीचा पावरफुल अॅक्शन पॅक नेता अजितदादा पवार यांची मंगळवेढ्यात गुरुवारी प्रचार सभा



प्रतीनिधी : 
राष्ट्रवादीने पंढरपूर मंगळवेढा मतदार संघावर पकड मजबूत करण्याचे ठरवत खा. अमोल कोल्हे ,  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विक्रमी सभा घेत आपली पकड मजबूत केली आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रचारसभा गुरुवारी 17/ 10/ 2019 रोजी सकाळी 10:00 वाजता आठवडा बाजार मंगळवेढा येथे होणार आहे . 

स्पष्टवक्तेपणा आणि बाणेदारपणा यामुळे अजितदादा महाराष्ट्रभर ओळखले जातात.
राष्ट्रवादीला युवक वर्गाचा मिळणारा प्रतिसाद आणि सर्वसामान्य जनतेची असणारी साथ याला अजित पवार सहज आपलेसे करत आहेत असे चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढण्याचे काम साध्या भाषेत करत असल्यामुळे लोकांना ते पटत आहे. यूट्यूब वर त्यांच्या डायलॉगवर बरेच व्हिडिओ बनवले गेले आहेत. फक्त तरुणाईतच नव्हे तर सर्व वयोगटात त्यांचा चाहता वर्ग आहे.

इथल्या बर्‍याच छोट्या मोठ्या  नेत्यांच्या हालचाली त्यांना माहीत असल्यामुळे ही प्रचार सभा फक्त मतदार जनतेसाठीच नसून स्थानिक पुढार्‍यांसाठी सुद्धा महत्वाचीच असणार आहे. 

test banner