राष्ट्रवादी कॉग्रेसने केवळ गप्पा मारण्याचे काम केले- रामदास आठवले सुधाकरपंताना निवडून देऊन विरोधकांचा काट्याने काटा काढा! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

राष्ट्रवादी कॉग्रेसने केवळ गप्पा मारण्याचे काम केले- रामदास आठवले सुधाकरपंताना निवडून देऊन विरोधकांचा काट्याने काटा काढा!

         
                                                                               *होलार समाजाचा पाठिंबा****
मंगळवेढा येथील होलार संघटनेने सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा जाहीर केला.तसेच  गणपतराव लवटे, राष्ट्रवादीचे दत्तात्रय भोसले व वाजीद काझी,गणेश धोत्रे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.                                          मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी व ३५गावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदाराकडून अनेक आश्वासने मिळाली पण त्यांनी पूर्ण केले नाहीत. नुसती जनतेची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजून घेतली.गेल्या १५ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतेही विकासात्मक काम न करता केवळ गप्पा मारण्याचे काम केले असल्याचा घनानती  आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केला.
मंगऴवेढा येथे  ते भाजप उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत   सभेत  ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,स्टार प्रचारक हरिश्चंद्र भोई,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,संत दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार,चरनूकाका पाटील,नगरसेवक अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,माजी सभापती शिवानंद पाटील,औदुंबर वाडदेकर, माजी नगरसेवक गोपाळ भगरे,चंद्रशेखर कोंडुभैरी,शिवसेना शहरप्रमुख सुनील दत्तू,रासपचे धनाजी गडदे,दाजी पाटील आदीजन उपस्थित होते.

ना.आठवले पुढे बोलताना म्हणाले की,मंगळवेढा-पंढरपूर मधील लोकप्रिय नेता म्हणून कामाच्या बाबतीत सुधाकरपंत परिचारक यांचेच नावचर्चिले जाते.मंगळवेढा येथील होणारे संत बसवेश्वर महाराज व संत चोखामेळा यांचे स्मारक येत्या काही दिवसात पूर्ण होईल त्यासाठी आम्ही वाट्टेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही दिली. .मंगळवेढा तालुक्यातील जमिनीला पाणी मिळाले तर सोने ही उगवेल अशी इथली जमीन आहे
त्यासाठी आम्ही येत्या काही दिवसात सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हा पाणी प्रश्न मार्गी लावणार आहोत. राजकारणामध्ये संयम असला पाहिजे काम करण्याची धमक असली पाहिजे असा टोला  त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर दिले आहे
महिलांसाठी उज्वला गॅस योजना, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले आहे.

३५ गाव पाणी उपसा सिंचन योजनेसाठी येत्या काही दिवसात आम्ही पूर्ण करुन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचे पाणी मिळणार आहे.विठ्ठल साखर कारखाना बंद करण्याचा घाट घातला जात असून तो आपण पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू करू म्हणून त्यांनी आपल्या कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला.

कार्यक्रमाचे प्रस्तावित आ.प्रशांत परिचारक यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार शशिकांत चव्हाण व गौरीशंकर बुरकुल यांनी मानले.
test banner