मंगळवेढा/प्रतिनिधी
आमचं ठरलंय वारं फिरलंय'अस म्हणत मतदारसंघाच्या विकासावर भाष्य करत बेरोजगारी,पाण्याचा प्रश्न लोकप्रतिनिधींनीकेलेली दिशाभूल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदाररसंघाचा विकास समाधान आवताडेच करू शकतात असा विश्वास जनतेच्या मनात होत आहे त्यामुळे अनेक नेतेमंडळी गावागावातून पाठिंबा देत आहेत . पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान महादेव आवताडे यांचा गावां-गावांतून प्रचार सभांमध्ये विविध मान्यवर जाहीर पाठिंबा दर्शवून आवताडे गटात प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सभांना होणारी उस्फूर्त व प्रचंड गर्दी आणि वाढता पाठींबा यामुळे उमेदवार समाधान आवताडे यांचे बळ आणखी वाढलेले दिसून येते. मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजीच्या प्रचार दौ-यांमध्ये मेजर अरविंद सांगोलकर, मेजर कारंडे, आसबेवाडीचे उपसरपंच महेश खटकाळे, मा.उपसरपंच दादासो नागणे,रमेश नागणे, बालाजी भुसे, शाम आसबे, एकलासपूरचे धर्मराज ताड महाराज, मुंढेवाडी ता.पंढरपूरचे मा.सरपंच कृष्णदेव राऊत यांचेसह अनेकांनी उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.सामान्य जनता,सामान्य मतदार आवताडे यांना पाठिंबा देत आहेत तर काही नेतेमंडळी लक्ष्मीदर्शनासाठी इतर उमेदवारांचे उंबरठे झिजवतानाही दिसत असून या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर मंगळवेढा तालुक्यातील मतदार एकवटताना दिसत आहे .