हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात! तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात! तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार


मंगळवेढा( प्रतिनिधी) हुन्नुर ता.मंगळवेढा येथील श्री बिरौबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा सोमवारी दुपारी 4 वाजता भेटीच्या मैदानावर पार पडला.  भंडाऱ्यामध्ये न्हाहुन निघत हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. कर्नाटक राज्य तसेच सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी या गुरु शिष्य भेटीच्या सोहळ्यास हजेरी लावली होती.
  हुन्नुर येथील श्री बिरौबा हे हुलजंती येथुन महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत हजारो भाविक सकाळी 10 वाजता हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात गुरूच्या भेटीसाठी दाखल झाले होते.दुपारी तीन वाजता श्री बिरौबा मंदिरातून ढोल ताश्याच्या गजरात वाजतगाजत बिरौबाची पालखी घेऊन भाविक आलेनतर महालीगरायाची पालखी ओढ्यातून घेऊन भाविक भेटीच्या मैदानावर आले चार वाजता भेटीच्या मैदानावर गुरु शिष्यांच्या दोन्ही पालख्या आलेनतर सर्वप्रथम बैलाची भेट झाली व त्यानंतर हजारो भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या गजरात खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत मुक्तपणे भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत सुमारे 40 ते 50 हजार भाविकांच्या साक्षीने हा गुरु शिष्य भेट नयनरम्य सोहळा पार पडला.

चौकट
हुन्‍नूर येथील गुरु-शिष्य भेटीच्या या सोहळ्यात  दरवर्षी भाकणूक सांगण्याची प्रथा असते. यानुसार यावर्षीही जनावरांना सोन्याचे दिवस येतील, अन्नधान्य महागेल, राजकारणात उलथापालथ होईल, पाऊस पाणी साधारण राहील अशी भाकनूक सांगण्यात आली.
फोटो ओळी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथे बिरोबा-महालिंगराया या गुरू-शिष्याच्या अभूतपूर्व भेट सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.
test banner