पंढरपूर मंगळवेढ्यात “ राष्ट्रवादी पुन्हा ” म्हणत भारत नानांची विजयी हॅट्रिक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर मंगळवेढ्यात “ राष्ट्रवादी पुन्हा ” म्हणत भारत नानांची विजयी हॅट्रिक





प्रतीनिधी :
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेनी आ.भारतनाना भालके यांनाच विजयी करत परत हा गड राष्ट्रवादी कडे सोपवला आहे. राज्यात युतीचे सरकार येणार पण चर्चा शरद पवार साहेबांनी केलेल्या कामाचीच होत असताना दिसत आहे.
या मतदार संघातील भारत नाना भालकेंची विजयी हॅट्रिक हा जनतेने त्यांच्यावर आणि पवार साहेबावर दाखवलेला विश्वास आहे. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यापासून स्थानिक राष्ट्रवादीचे नेते त्यांना सोडून जात होते. 10 वर्षे आमदारिकीचा स्वत: च्या राजकारणासाठी वापर करून एनवेळी सोडून गेलेले शिलेदार, स्वार्थासाठी दिवसातून दोन वेळा पक्षांतर करणारे नेते हे सर्व सहन करत त्यांनी ही निवडणूक जिंकली केवळ जनतेच्या आधारावर.
नेते इकडून तिकडे जात होते पण जनता पवार साहेब आणि भारत नाना च्या बाजूला ठाम पणे उभी होती. युवा वर्ग राष्ट्रवादी कडे आकर्षित होत होता कारण डॉ अमोल कोल्हे , धनंजय मुंढे, अजित पवार यांच्या सभा तूफान झाल्या होत्या.विकासाचा मुद्दा लोकांना पटत होता.
विजयाचे ठळक वैशिष्ठ्ये :
1.     विरोधकांकडे कुठलाही ठोस मुद्दा नव्हता. फक्त भावनिक मुद्दा करून निवडणूक जिकण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांना आवडला नाही.
2.     तीन तीन पिढ्या शरद पवार साहेबांच्या कृपेने सत्ता भोगलेले स्थानिक नेते स्वार्थासाठी विरोधात प्रचार करू लागल्याने लोकांची सहानुभूती राष्ट्रवादीला मिळाली.  
3.     जनतेनी मागील निवडणुकीतच नाकारलेले कालबाह्य नेते आमदार आणि  पवार साहेबांवर  खालच्या भाषेत टीका करू लागल्याने जनतेला ते पटले नाही.
4.     युवकांना आपलेसे वाटेल असा कोणताही मुद्दा किंवा व्यक्ति विरोधकांनी जनतेसमोर आणली नाही. त्यामुळे युवक आपसूक राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांकडे आकर्षित होऊ लागले.  
5.     भारत नानांनी केलेली विकासकामे आणि भविष्यातील प्रस्तावित कामांचा आढावा प्रत्येक सभेत मांडला असल्यामुळे त्यांना लोकांनी पसंती दिली.
6.     दस्तूर खुद्द पवार साहेबांनी भारत भालकेसाठी घेतलेली विराट सभा ह्या सर्व गोष्टी लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेल्या.
इथली जनता विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करते हे अधोरेखित झाले.

निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रचंड प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधकांनी आपणच जिंकणार असे मनसुभे बांधले होते. पण जनतेनी ते साफ नाकारले.
विरोधक जनतेच्या फक्त खिश्यापर्यंत पोहचू शकले, पण त्यांच्या मनात पोहचणे शक्य झाले नाही.

आमदार साहेबांच्या सोबत राहून विविध पदे पदरात पाडलेले नेते यावेळी सोडून गेले.
निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार त्यां नेत्यांबद्दल  बोलताना म्हणाले होते “ माझ मीठ कोणत्या कंपनीच आहे ते चेक करावं लागेल ” आगामी वाटचाल करताना आमदार साहेबांना त्यांच मीठ बदलाव लागेल काय ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.  
राष्ट्रवादी पुन्हा , भारतनाना पुन्हा या सोबतच विकास पुन्हा हे चित्र पुढील पाच वर्षात दिसावे हीच इच्छा मतदार व्यक्त करत आहेत.

test banner