राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून मिळणार विदयार्थ्यांना नवीन संधी:- प्रा.प्रगती मुळीक - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून मिळणार विदयार्थ्यांना नवीन संधी:- प्रा.प्रगती मुळीक


मंगळवेढा:- 

नवीन येऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) मधून विदयार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक संधी मिळणार असल्याचे मत दामाजी महाविद्यालयाची माजी विदयार्थीनी व सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IOIT),पुणे येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.प्रगती राजकुमार मुळीक यांनी व्यक्त केले.


त्या श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या.


विशेष बाब म्हणजे ज्या महाविद्यालयात अकरावी व बारावी शास्त्रचे शिक्षण घेतले,त्याच महाविद्यालयात आणि त्याच वर्गात आज मार्गदर्शिकेच्या भूमिकेत उभे राहणे ही गोष्ट अभिमानास्पद ठरली.


यावेळी सुरवातीस महाविद्यालचे प्राचार्य डॉ.परमेश्वर होनराव यांच्या हस्ते प्रा.प्रगती मुळीक यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रा.मुळीक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची उद्दिष्टे,वैशिष्ट्ये आणि भारतीय शिक्षणव्यवस्थेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच बहुविद्याशाखीय शिक्षण,विषय निवडीतील लवचिकता,अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स,एकाधिक प्रवेश व निर्गमन व्यवस्था,कौशल्य विकास,व्यावसायिक शिक्षण,इंटर्नशिप तसेच रोजगार व उद्योजकतेच्या संधी यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. 


याशिवाय विविध शिष्यवृत्ती योजना,ऑनलाइन अभ्यासक्रम (MOOCs), SWAYAM आणि उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी माजी विद्यार्थिनीने आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग नव्या पिढीच्या शैक्षणिक वाटचालीसाठी केल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण,कौशल्य विकास आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत उपयुक्त दिशा मिळेल असा आशावाद व्यक्त करत आपल्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी दिल्याने प्रा.प्रगती मुळीक यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.


सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे. याप्रसंगी AISSMS IOIT, पुणे यांच्या पुढाकाराने आयोजित जनजागृती व मार्गदर्शन सत्रात इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.


यावेळी प्राचार्य डॉ.पी.एम. होनराव,प्रा.राजकुमार मुळीक,प्रा.शैलेष मंगळवेढेकर,प्रा.सारिका काटे,प्रा.अश्विनी रहाणे,प्रा.निर्मला सावंत उपस्थित होते.


सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा.धनाजी गवळी यांनी केले तर प्रा. शारदा खुणे यांनी आभार मानले.

test banner