मंगळवेढा:-
सध्या महाराष्ट्र भर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडुकीची रणधुमाळी सुरू आहे.मंगळवेढा तालुक्यातून चार गटांमधून अनेक उमेदवार इच्छुक असून अनेक अर्ज भरण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी गावातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक उच्च शिक्षित महिला सौ.रेश्मा माणिक गुंगे यांनी संत चोखामेळा नगर पंचायत समितीच्या गणात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्या एक उच्चशिक्षित असून उत्तम लेखिका,कवी व निवेदन या अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव असल्यामुळे आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी याचा फायदा होईल.
तसेच त्यांना आतपर्यंत २५ ते ३० जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या उच्चशिक्षणाचा व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासा साठी त्यांची उमेदवारी सक्षम मानली जात आहे.
