सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा पावनखिंड देखावा पाहण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा पावनखिंड देखावा पाहण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद.


मंगळवेढा:- 

सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा पावनखिंड देखावा पाहण्यासाठी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे ऐतिहासिक देखाव्याच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास जागवण्याचा स्तुत्य उपक्रम मंडळाने राबविला असुन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य,मावळ्यांची निष्ठा,त्यागाची भावना आणि शत्रूसमोर न झुकणारा स्वाभिमान हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे याचे दर्शन घडविले आहे.


मंडळाने 500 फुटाची खिंड उभारली असुन धबधबा,पाऊस,झाडी यामुळे प्रत्यक्षात खिंडीत गेल्याचा रोमांचकारी भास नागरिकांना होत आहे.


या लढाईत नरवीर बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात अभिमान जागवते असुन सप्तशृंगी नवरात्र मंडळाने नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास,मावळ्यांचे बलिदान आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी केलेल्या संघर्षाची ओळख करून दिली आहे.


सदर देखाव्यात पन्हाळगडावरून बाहेर पडल्यानंतर शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोहचल्याचा प्रसंग उभा केला आहे असुन सप्तशृंगी नवरात्र मंडळाने पावनखिंडचा रणसंग्राम’ या ऐतिहासिक देखाव्याच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाची प्रेरणा घराघरांत आणि तरुणांच्या मनामनांत पोहोचत आहे त्यामुळे मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

test banner