सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चाऱ्याचा आधार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चाऱ्याचा आधार.


मंगळवेढा:- 

मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा उपलब्ध व्हावा आणि पशुधनाचे संरक्षण व्हावे,या उद्देशाने सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने जनावरांना चारा वाटप करून खरोखरचं दुर्गामातेच्या भक्तीबरोबर मुक्या जनावरांना आधार देण्याचे फार मोठे काम केले आहे.


स्वामी समर्थ गोशाळा,रिद्धी सिद्धी गोशाळा,मंगळवेढा स्मशानभूमी तसेच वाडी वस्त्यावरती जाऊन शंभर जनावरांना चारा देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.


दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असताना पशुधन जगविण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे असुन जनावरांना चारा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे हे सप्तशृंगी नवरात्र मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.


नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.


यावेळी जनावरांच्या मालकांनी गरजूंच्या मदतीसाठी तसेच मुक्या प्राण्यांच्या संगोपनासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासमोर सेवाभावाचा आदर्श ठेवणारा आहे.


 तरी दुष्काळाच्या संकटात पशुधनाला आधार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा,यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना समाजातील नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.


यावेळी मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे,दत्तात्रय जावळे,अशोक कोळी,दिलीप वाडेकर,अविनाश चेळेकर,संजय डांगे,विजयराज कलुबर्मे,विनोद सावंत,शिवाजी जगदाळे,संभाजी नागणे सुधीर सावंजी,अजित गोवे,ऋतुराज भगत,गणेश गांडुळे,शरद रुपनर,रणजित चेळेकर,कृष्णा ओमणे,रामेश्वर पवार,ओम खटकळे,सोहम घोडके,सोमा सपाटे,शुभम कांबळे,प्रथम सावंजी,प्रा.विनायक कलुबर्मे आदीजण उपस्थित होते.

test banner