एक दिवस गावासाठी मोहिमे अंतर्गत श्री.खंडोबा व काळभैरव मंदिर परिसराची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १८ जानेवारी, २०२६

एक दिवस गावासाठी मोहिमे अंतर्गत श्री.खंडोबा व काळभैरव मंदिर परिसराची स्वच्छता.


मंगळवेढा:-

एक दिवस गावासाठी हा उपक्रम मंगळवेढा शहरात दर रविवारी राबविला जात असून मंदिर किंवा एका परिसराची स्वच्छता करण्यात येते त्या मोहिमेअंतर्गत रविवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत खंडोबा गल्ली येथील श्री काळभैरव मंदिर व श्री.खंडोबा मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.


मंगळवेढा शहरातील जागृक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांना एकत्र घेऊन उपक्रम राबवला जात आहे.यामध्ये मंदिर परिसरातील पालापाचोळा,नारळाची केसरे एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावली तसेच संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला.


दर रविवारी होणाऱ्या स्वच्छते मोहिमेमध्ये मंगळवेढा शहरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील यावेळेस करण्यात आले.


सदर मोहिमेमध्ये शिवाजी वाकडे,विलास आवताडे,वैभव महाडिक,सुमित आवताडे,आण्णासाहेब देशमुख,दत्ता बाबर,सुजित मुदगुल,परमेश्वर पाटील,बंकट टुले,रावसाहेब मुदगुल,बलवान वाकडे,सुरेश आवताडे,अमित महाडिक,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदवला.

test banner