सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न.


मंगळवेढा:-

येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने देवीच्या मंदिरात सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.


सदर आरोग्य तपासणी शिबीरामध्ये नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयूचे डॉ.आरव कांबळे,डॉ.दिक्षा मोगल,डॉ.राहुल शेजाळ,डॉ.दत्तात्रय क्षिरसागर यांनी डोळे शुगर,बीपी तपासणी करून औषधोपचाराचा सल्ला देऊन समुपदेशन केले.


गरजूंना लाभ व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उत्तम सेवा करण्याचे काम केले आहे.


बदलती जीवनशैली,पोषक आहाराचा अभाव या बाबींचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.त्यातच सतत तणावात राहिल्यामुळे देखील नकळतपणे काही आजारांची लागण होत आहे हे टाळण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन आणि तणावमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असून,निरोगी आयुष्यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.


नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच सर्वसामान्यांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी,या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


धार्मिक उत्सवांसोबतच सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.


सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयूचे विशेष सहकार्य लाभले.

test banner