सप्तशृंगी मंडळाच्या पावनखिंड देखाव्यातून तरुणांना होणार इतिहासाची ओळख:- समाधान आवताडे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी मंडळाच्या पावनखिंड देखाव्यातून तरुणांना होणार इतिहासाची ओळख:- समाधान आवताडे.


मंगळवेढा:- 

सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने पावनखिंडीचा देखावा सादर करून तरुण पिढीला खऱ्या अर्थाने इतिहासाची ओळख करून दिली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यरक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या नरवीरांच्या पराक्रमाची माहिती अशा देखाव्यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे,असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले ते सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने उभारलेल्या पावनखिंड देखाव्याचे उदघाटन करताना ते बोलत होते.


पावनखिंडीचा इतिहास हा केवळ शौर्याचा प्रसंग नसून त्याग निष्ठा,स्वामीनिष्ठा आणि स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणाची प्रेरणादायी गाथा आहे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला अतुलनीय त्याग आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे.


अशा ऐतिहासिक प्रसंगांचे सजीव चित्रण करून मंडळाने सामाजिक आणि ऐतिहासिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे,असेही आमदार आवताडे यांनी नमूद केले सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळ गेल्या ३६ वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सांस्कृतिक,सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित उपक्रम राबवत आहे.


यंदाच्या पावनखिंड देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास,मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे सांगून मंडळाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.


यावेळी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे,नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके,प्रा.शिवाजी काळुंगे,प्रकाश गायकवाड,चंद्रकांत पडवळे,औदुंबर वाडदेकर,विनायक यादव,मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे.  


यांचेसह सर्व पदाधिकारी व भाविक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोगले यांनी करून आभार मानले.

test banner