मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मंगळवेढा येथील करुणा मतिमंद व मूकबधिर शाळेतील सर्व मुलांमुलींना फळे व खाऊ वाटप करून देवीचा खरा उत्सव साजरा करून सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची आणि आनंद वाटून घेण्याची संधी आहे,या भावनेतून मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या सहवासातून मिळणारे समाधान हेच या उपक्रमाचे खरे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देत समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी,प्रेम आणि माणुसकी जपण्याचा संदेश सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाने या उपक्रमातून दिला असुन सर्व स्तरातून मंडळाचे कौतुक होत आहे.
सप्तशृंगी मंडळाचा नेहमीच सर्वच मुलांना आधार असतो त्याबद्दल शाळेच्या वतीने मंडळाचे आभार मानण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे,माजी अध्यक्ष दत्तात्रय जावळे,दिलीप वाडेकर,अविनाश चेळेकर,संजय डांगे,विजयराज कलुबर्मे,संभाजी नागणे,कृष्णा ओमणे,रणजित चेळेकर,ऋतुराज भगत,सिद्धेश्वर डोंगरे,ओम खटकाळे,रामेश्वर पवार,सुधीर सावंजी,शरद रुपनर,रियाज शेख यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.
