सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांचे रक्तदान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांचे रक्तदान.


मंगळवेढा:-
 येथील सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने देवीच्या मंदिरात रविवारी आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून समाजाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली.


रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले सदर रक्तदान शिबिरासाठी सांगोला रक्तपेढीचे सहकार्य लाभले.


 नवरात्र उत्सव साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.


सध्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या रक्तदान शिबीराचे या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष समाधान डोंगरे यांचेसह सर्व पदाधिकारी,सदस्यांनी परिश्रम घेतले.

test banner