सप्तशृंगी देवी मंदिरात बामणे परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

सप्तशृंगी देवी मंदिरात बामणे परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप.


मंगळवेढा :- 

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी देवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गा अष्टमी निमित्त मंडळाचे राजेंद्र बामणे व परिवाराच्या वतीने शाबू खिचडी,केळी असे फराळाचे वाटप करण्यात आले.


 

यावेळी धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.


नवरात्रोत्सव हा भक्ती,श्रद्धा आणि सेवाभावाचा उत्सव मानला जातो या उत्सवाचे औचित्य साधून बामणे परिवाराने फराळ वाटपाचा उपक्रम राबविला देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करून त्यांनी नवरात्रोत्सवातील आनंद द्विगुणित केला.


धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारे असे उपक्रम समाजात सकारात्मकता आणि आपुलकीची भावना निर्माण करतात.


बामणे परिवाराने राबविलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने बामणे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला

test banner