ज्ञानदानांच्या शिल्पकारांचा गौरव ... मंगळवेढा येथे लोकमंगल बँकेच्या वतीने 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२६

ज्ञानदानांच्या शिल्पकारांचा गौरव ... मंगळवेढा येथे लोकमंगल बँकेच्या वतीने 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन

 


प्रतिनिधी

लोकमंगल को-ऑप बँक, लि. सोलापूर शाखा मंगळवेढा यांच्या वतीने आणि माजी सहकार मंत्री, आमदार तथा लोकमंगल बँकेचे अध्यक्ष मा. आ. सुभाष (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी १०:०० वाजता नगर वाचनालय सभागृह, चोखामेळा चौक, मंगळवेढा येथे पार पडणार आहे.



या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदा (आबी) बबनराव आवताडे भूषवणार असून, पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली आनंद ताड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सभापती श्री. सोमनाथ विष्णुपंत आवताडे, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डॉ. श्री. बिभिषण अर्जुन रणदिवे, लोकमंगल बँकेच्या संचालिका सौ. उज्वला संजय चेळेकर तसेच नीट परीक्षा मार्गदर्शक व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. श्री. विश्वनाथ ढेपे उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे:

शिक्षणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल तालुक्यातील खालील गुणवंत शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे:

श्री. राकेश औंदुंबर गायकवाड (जि.प.प्राथ.शाळा, साखर कारखाना)

श्री. अशोक गजानन शिंदे (जि.प.प्राथ.शाळा, आसबेवाडी)

श्री. सर्जेराव दशरथ रुपनर (जि.प.प्राथ.शाळा, कचरेवाडी)

श्री. महेंद्र महादेवराव अलोकार (जि.प.प्राथ.शाळा, नंदूर)

श्री. शरद गोरखनाथ पाटील (जि.प.प्राथ.शाळा, डिकसळ)

श्री. दशरथ लक्ष्मण गणपाटील (जि.प.प्राथ.शाळा, सांगोलकरवस्ती)

सौ. मनीषा सुखदेव सांगोलकर (जि.प.प्राथ.शाळा, सिध्दनकेरी)

श्रीमती भारती येताळा नागणे (न.पा.कन्या शाळा नं.२ मंगळवेढा)

श्रीमती भारती विठ्ठल माने (जि.प.प्राथ.शाळा, शिरसी)

श्री. नंदू रामा डांगे (जि.प.प्राथ.शाळा, जगदाळे मळा)

श्री. प्रविण रेवणसिद्ध कोष्टी (जि.प.प्राथ.शाळा, अकोले)

श्री. शिवाजी सुखदेव पोफळे (जि.प.प्राथ.शाळा, गुंजेगाव)

श्री. दत्तात्रय सत्याबापू कोळी (जि.प.प्राथ.शाळा, मारोळी)

श्री. अमीर कादर खतीब (जि.प.प्राथ.शाळा, वाघमोडेवाडी)

श्री. मच्छिंद्र श्रीपती बनसोडे (विद्यामंदिर हायस्कूल, सलगर बु.)

या सोहळ्याला तालुक्यातील शिक्षक बंधू - भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमंगल बँक, शाखा मंगलवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

test banner