मंगळवेढा:-
शिक्षक दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कै. सौ. लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला, मित्रनगर येथे २५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.शुक्रवार,दि. ४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा संचलित कै. सौ. लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला येथे संजीवनी फाउंडेशन, भाग्यविधाता सोशल वेल्फेअर ट्रस्ट पुणे,आणि ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स प्रा. लि.यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास संस्थापक बजरंग दत्तू,अध्यक्ष सुनीता दत्तू, मुख्याध्यापिका संगीता क्षीरसागर, भाग्यविधाता सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्षा श्रद्धा कंडुडे तसेच ॲग्रीकॉस एक्सपोर्ट्स प्रा.लि.चे डायरेक्टर अजय आदाटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शाळेच्या परिसरात अधिकाधिक हिरवाई निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
वृक्षारोपणासाठी संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन चे सर्व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम शाळेच्या परिसरात राबविण्यात आल्याने उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.
