पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या नूतन शिक्षकांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या नूतन शिक्षकांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार संपन्न

 

 


 प्रतिनिधी : 

मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवार दि.३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वा . जिल्हा सोसायटीमध्ये सत्कार समारंभ संपन्न झाला. 

यावेळी पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झालेले संकेत चंद्रकांत माने, पवित्र पोर्टल मधून प्राथमिक/माध्यमिक शिक्षक पदी निवड झालेले विश्वजित अशोक शिंदे,



सौरभ शिवाजी मुढे, अनिकेत शिवाजी मुढे, सौ.सरोज सुशेन क्षीरसागर, सारंग नागनाथ कोकरे, सौ.मनिषा भिमराव पवार, सौ.स्वाती लिगाडे, कु.पूजा सायाप्पा कुंभार, सौ.सोनाली अजिक्य देवकते, नागेश मधुकर रणे, शिवतेज महादेव जाधव

  या यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षक संघ पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.



    यावेळी सत्काराला उत्तर देताना संकेत माने यांनी MPSC चा अभ्यास, परीक्षेनंतर रिझल्ट आणि नंतर सिलेक्शन पर्यंत येणारा मानसिक ताणतणाव सांगून त्या परिस्थितीत खंबीरपणे संयमाने राहणे आवश्यक असल्याचे विचार मांडले. नूतन शिक्षकांनी आपण केलेले परिश्रम व खडतर प्रवास सांगितला. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी तानगावडे, राज्य संघाचे नपा मनपा सरचिटणीस संजय चेळेकर सर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दादा इंगवले सर यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

test banner