मंगळवेढा :-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एक मराठा लाख मराठा,संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच एक मराठा लाख मराठा अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शासनाने गांभीर्याने पाहून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उद्या सकाळी 11 वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी निवेदन देण्यात येणार असून सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय न झाल्यास शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी मंगळवेढा बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवेढ्यातील सकल मराठा समाज एकवटला असून,पुढील आंदोलनाची दिशा शासनाच्या निर्णयानंतर ठरविण्यात येणार असून भविष्यातील आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
