मंगळवेढा :-
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेट लागू करावे आणि मराठा समाजाला न्याय द्या या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
माढ्यानंतर सरकोली येथेही मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी सरकोली येथील सभा आटोपल्यानंतर मंगळवेढ्यातील मराठा बांधवांच्या आग्रहास्तव ऐनवेळी आपल्या ठरलेल्या मार्गात बदल करून मंगळवेढ्यात येण्याचे मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून मंगळवेढ्यातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास नतमस्तक होऊन अभिवादन केले.
यावेळी मराठा बांधवांनी त्यांचे एक मराठा लाख मराठा,एकच मिशन मराठा आरक्षण,जय भवानी जय शिवाजी अशा घोशनांनी परिसर दनणून गेला होता.
यावेळी मंगळवेढा नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले.
याप्रसंगी दामाजी शुगरचे संचालक सिद्धेश्वर आवताडे,लतीफ तांबोळी,नगरसेवक प्रशांत गायकवाड,सीमाताई बुरजे,प्रमोद सावंजी यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व शिवभक्त,अनेक मराठा बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची तयारी मोठ्या स्वरूपात करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले.
आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मंगळवेढा भेटीमुळे मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,मराठा आरक्षणाच्या लढ्याला मंगळवेढ्यातूनही ठाम पाठिंबा असल्याचे जरांगे यांनी समाधान व्यक्त केले.
