मंगळवेढा:-
छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शवत विचारांची ओळख तरुणांना व्हावी याकरिता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी व कवी कलश यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लब,कडून मंगळवेढा-तुळापूर-वढू बुद्रुक २५४ किलोमीटर ऐतिहासिक सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सदर ऐतिहासिक सायकल मोहीम होणार असुन सदर मार्गावर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा जागर परिपत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे सहभागी होणाऱ्या सायकलस्वारास टी-शर्ट,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मोहिमेचा पहिला मुक्काम भिगवण,दुसरा मुक्काम तुळापूर येथे होणार असून वढू बुद्रुक याठिकाणी समारोप होणार आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागातून आणि बलिदानातून पावन झालेली तुळापूर-वढू बुद्रुक ही स्थळे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत उभी आहेत त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे ही ऐतिहासिक स्थळे नेमकी काय आहेत हे तरुणांना कळावे.
आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत असलेले संगमेश्वर मंदिर,तीन नद्याच्यां संगमावरती असलेले तुळापूर-वढू बुद्रुक ही देशातील खरी तीर्थक्षेत्रे आहेत तसेच पर्यावरण संवर्धन व जनजागृती,गड संवर्धन,निसर्गाचे रक्षण व आरोग्य संवर्धन,इंधन बचत असे अनेक हेतूने डोळ्यापुढे ठेवून वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने प्रत्येक वर्षी सायकल मोहीम काढली जाते.
याआगोदरही सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा ते शिखर शिंगणापूर,मंगळवेढा ते बानूरगड,मंगळवेढा-पाचाड-रायगड सोलापूर-मंगळवेढा,मंगळवेढा-पंढरपूर,मंगळवेढा-माचणूर,मंगळवेढा-खोमनाळ,मंगळवेढा-कचरेवाडी अशा अनेक सायकल राईडमधून प्रबोधन केले आहे तरी सायकल मोहिमेत सहभागी होण्यासाठी व ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ९४०३४५१२९७ / ९०२८८८६०५५ / ७२७६८६०८४२ या क्रमांकावरती संपर्क करुन नाव नोंदणी करावी असे आवाहन वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.