श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान.


मंगळवेढा:- 

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता हीच सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.




स्वच्छ भारत, स्वस्थ भारत,माझे महाविद्यालय सुंदर महाविद्यालय या संकल्पनेला चालना देण्यासाठी महाविद्यालयात इयत्ता आकरावी कला शाखेतील स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या आवरातील झाडांना आळी करणे,प्लास्टिक पिशव्या गोळा करून गवत काढून स्वच्छता केली.


विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर सामाजिक जबाबदारीही जाणीव व्हावी याकरिता सदर अभियान राबविले जाते.


यावेळी संथेचे सचिव किसनराव गवळी,उपप्राचार्य प्रा.विलास गुरव,कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.संगाप्पा पाटील,प्रा.गोविंद गायगोपाळ,प्रा.श्रीराम पवार,प्रा.राजाराम पवार,प्रा.विनायक कलुबर्मे यांचेसह स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

test banner