मुलांनी अभ्यासातून स्वतःचे व गावाचे नाव मोठ्ठे करावे:- प्रा.विनायक कलूबर्मे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १२ जुलै, २०२६

मुलांनी अभ्यासातून स्वतःचे व गावाचे नाव मोठ्ठे करावे:- प्रा.विनायक कलूबर्मे.


मंगळवेढा:- 

जि.प.शाळेतील सर्व मुलांमुलींनी अभ्यास करून स्वतःचे,आपल्या गावाचे,आई वडिलांचे,गुरुजींचे नाव मोठे करावे असे मत प्रा.विनायक कलुबर्मे यांनी व्यक्त केले ते दामाजी कारखाना वसाहत जि.प.प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना वह्या वाटप कार्यकमात बोलत होते.


आपल्या स्वतःच्या घराच्या गृहप्रवेशाप्रसंगी कोणताही आहेर व भेटवस्तू न स्वीकारता कलुबर्मे परिवाराने वह्याची भेट स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील अनेक जि.प.शाळेतील विदयार्थ्यांना सदर वह्या वाटप केल्या जात आहेत.


यावेळी प्रा.कलुबर्मे म्हणाले शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील जि.प.शाळा हाच विदयार्थ्यांचा खऱ्याअर्थाने शैक्षणिक कणा आहे सदर शाळेतील अनेक मुलांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अनेक अडचणी असतात ही गरज ओळखून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आम्ही वह्या वाटप हा उपक्रम हाती घेतलेला आहे.


वास्तुशांतीला येणाऱ्या फेट्यासाठी,हारासाठी अनावश्यक पैसे खर्च होतात त्याच्याऐवजी त्याच पैशाचा वापर वह्यासाठी केला तर त्याचा निश्चितच मुलांना उपयोग होऊ शकतो आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो हेच खरे समाधान आम्हाला मिळत आहे असे सांगत विदयार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


बुधवारी जि.प. प्राथमिक शाळा हनुमाननगर,जि.प.प्राथमिक शाळा दामाजी साखर कारखाना वसाहत,प्राथमिक जि.प. प्राथमिक शाळा जैन-हरिजनवस्ती,जि.प. प्राथमिक शाळा गडदेवस्ती,जि.प. प्राथमिक शाळा उचेठाण,जि प प्राथमिक शाळा बठाण,जि प प्राथमिक शाळा बेदरेवस्ती,जि प प्राथमिक शाळा घोडकेवस्ती,जि प प्राथमिक शाळा माचणूर,जि प प्राथमिक शाळा डोकेवस्ती या शाळेतील सर्व विदयार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सदर उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले.


यावेळी गितांजली यादव,रेश्मा मेटकरी,राजेश माने,अनिल गडदे,सरोजा पोतदार,लक्ष्मण पाटील,अनिलकुमार पाटील,लक्ष्मण साखरे,बसवराज कोरे   धर्मदास घोडके,घनशाम शिंदे,मेघाराणी लंगोटे,सुवर्णा कुंभार,रोहिणी तेली,सुवर्णा साळुंखे,सुजाता पुजारी,सुवर्णा,दत्तात्रय कांबळे,सोमदळे,चंद्रकांत चेळेकर,नंदकुमार आतकरे,प्रा. विनायक कलुबर्मे उपस्थित होते.

test banner