प्रतिनिधी :-
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या इयत्ता अकरावी कला,वाणिज्य,शास्त्र शाखेत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सत्र आरंभ प्रवेशोत्सवाची सुरवात संस्थापक स्व रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले यावेळी स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ.परमेश्वर होनराव म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षण,शिस्त,संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधून आपले प्रमुख ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असलेले ग्रंथालय,प्रयोगशाळा,जिमखाना,संगणकलॅब,राष्ट्रीय सेवा योजना तसेच विविध उपक्रम व कल्याणकारी योजनांचा विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
ऑनलाईन प्रवेश पद्धतीत पालकांनी दाखविलेल्या विश्वाबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी उपप्राचार्य प्रा.विलास गुरव,पर्यवेक्षक प्रा.धनाजी गवळी यांचेसह पालक शिक्षक शिक्षका व विदयार्थी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख शैलेंद्र मंगळवेढेर यांनी केले.
