जगात भारी सायकल वारी पंढरपूर सायकल संमेलनात वारी परिवाराचा नारा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १२ जुलै, २०२६

जगात भारी सायकल वारी पंढरपूर सायकल संमेलनात वारी परिवाराचा नारा.


मंगळवेढा:- 

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत संपन्न झालेल्या पाचव्या अखिल महाराष्ट्र सायकल वारी व रिगंण सोहळ्यात मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने जगात भारी सायकल वारीचा नारा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


यावेळी नगर प्रदक्षिणा मार्गावर विठू नामाच्या गजराने पंढरपूर नगरी दुमदुमली होती सदर सायकल संमेलनात सायकल चालवा,इंधन वाचवा,झाडे लावा झाडे जगवा,चला झाडे लावू चला,सायकल चालवू व्यसनापासून दूर राहू,सायकल चालवा पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देणारे अनेक बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.


तसेच रेल्वे मैदानावर झालेल्या सायकल रिंगण सोहळ्यात क्लबचे सदस्य देहभान विसरून सर्वजण भक्तीरसात न्हाऊन निघाले तर पंढरपूर सायकल वारी चॅलेंजमध्ये ६० राईड पूर्ण करून १००० किलोमीटर सायकलिंग टप्पा पूर्ण केलेल्या पंधरा सायकल पट्टूचां मेडल देऊन सन्मान करण्यात आला तर वारी परिवार सायकल क्लबला विठ्ठलाची मूर्ती देऊन गौरविण्यात आले आरोग्य,पर्यावरण व अध्यात्म या त्रिवेणी संगमातून संपन्न झालेल्या सायकल वारीत महाराष्ट्रातून तब्बल पाच हजार सायकलपटू वारीत सहभागी झाले होते.


सदर सायकल संमेलन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सायकल्स क्लब,नाशिक सायकलिस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले.


यावेळी सोलापूर महावितरण सर्कलचे अधिक्षक अभियंता सुनिल माने यांचेसह क्लबचे पृथ्वीराज कलुबर्मे शिवतेज कलुबर्मे,केदार हजारे,जयंत पवार,चंद्रकांत काकडे,प्रा महेश अलिगावे,राहुल सावंजी,प्रफुल्ल सोमदळे,रतिलाल दत्तू,संजय जावळे,सचिन साळुंखे,तानाजी हेंबाडे,दत्तात्रय जाधव,सिद्धेश्वर डोंगरे,भारत नागणे,यश महामुनी,प्रमोद महामुनी,अविराज जाधव,नंदकुमार नागणे,समर्थ महामुनी,कमलेश माळी,भारत (सोनू) नागणे,गणेश मोरे,रविराज जाधव,प्रा.विनायक कलुबर्मे आदी सदस्य उपस्थित होते.

test banner