मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून२६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
सुरवातीस सैनिकांच्या शौर्याची प्रतिक असलेल्या बंदुकीचे पूजन वीरपत्नी शामल माने,लक्ष्मी पवार,शांताबाई चव्हाण,सविता ठोंबरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष सुनंदाताई आवताडे,ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे,जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,नगरसेविकास सीमाताई बुरजे,क्रांती दत्तू,दत्तात्रय भोसले,वारी परीवाराचे अध्यक्ष सतीश दत्तु,नागेश डोंगरे,आसीफ मुल्ला,अमोल रत्नपारखी,खंडु खंदारे,संघटनेचे अध्यक्ष मल्लया स्वामी,संस्थापक बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सुनंदाताई आवताडे,रमेश जोशी,मेजर मल्लया स्वामी यांनी कारगिल युद्धातील अनेक आठवणी सांगितल्या सर्व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.स्वाती दिवसे यांनी केले आभार मेजर चंगेजखान इनामदार यांनी मानले.
कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.यावेळी माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य व समस्त मंगळवेढेकर उपस्थित होते.
