मंगळवेढा:-
मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवार दि ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या मंगळवेढा ते अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ कर्मस्थळ ते समाधीस्थळ पर्यटन स्थळ जनजागृती सायकल राईडमधून मंगळवेढ्याच्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाला राज्यासह देशभरात नवी ओळख निर्माण होऊन मंगळवेढ्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
पहाटे ५ वाजता स्वामी समर्थ मंदिरापासून निघालेली सायकल राईड मंगळवेढा-माचणूर- बेगमपुर-कामती- तिऱ्हे-सोलापूर-कुंभारी-वळसंग-अक्कलकोट या मार्गावरुन जात असताना अनेक संतांची मंगळवेढा नगरी ही पर्यटन स्थळ म्हणून जनजागृती व्हावी याकरिता संदेश देण्यात आला.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल १२ वर्षे मंगळवेढा येथे वास्तव्यास राहून अनेक भक्तांचे जीवन घडविले आहे त्यामुळे मंगळवेढा ही केवळ एक नगरी नसून श्री स्वामी समर्थांचे कर्मस्थळ म्हणून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे मात्र, आजही अनेक भाविक थेट अक्कलकोटला जातात; परंतु स्वामी समर्थांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे ऐतिहासिक महत्त्व अनेकांना माहीत नसल्याने हीच बाब लक्षात घेऊन वारी परिवाराने १०१ किलोमीटर सायकल प्रवास करून पर्यटन जनजागृतीसाठी हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
सदर सायकल राईडमधून मंगळवेढ्याच्या पर्यटन,संस्कृती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच श्री स्वामी समर्थांचे कर्मस्थळ,संत दामाजी महाराजांची कर्मभूमी,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,महात्मा बसवेश्वर यांसारख्या महान संतांचा वारसा लाभलेल्या मंगळवेढ्याची ओळख अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मंगळवेढ्यात जास्तीत जास्त भाविक,पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल व्यवसाय,व्यापारी,वाहनचालक, शेतकरी,फुलविक्रेते,हस्तकला व्यावसायिक तसेच युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यासाठी वारी परिवार सतत प्रयत्नशिल आहे.
यावेळी अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी स्वागत करीत मंदिर समितीच्या वतीने सायकल क्लबचा सन्मान केला.
याप्रसंगी बजरंग कलुबर्मे,सिनाई ऍग्रो रिसॉर्टचे अंकुश आवताडे,शिवाजी भोसले,सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद भोसले,माऊली पवार,नागेश खरात,प्रकाश ननावरे,विजयकुमार माणकोजी,सिद्धारूढ काळे,डॉ शिवराया आडवीतोट,प्रा.प्रकाश सुरवसे,सुभाष पुजारी,सोलापूर सायकल क्लब यांनी सर्व सायकलपट्टूचे जंगी स्वागत केले.
सदर राईडसाठी सुरवसे आणि कंपनीचे सत्यजित राजेंद्र सुरवसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पर्यटन जनजागृती मध्ये शिवन्या कलुबर्मे,स्वप्निल टेकाळे,महादेव दत्तू,अविनाश जाधव,महेश अलिगावे,राहुल सावंजी,नागेश डोंगरे,शरद हेंबाडे,प्रफुल्ल सोमदळे,सागर लंगोटे,सिध्देश्वर डोंगरे,विष्णू भोसले,ओम डोंगरे,रोहित नागणे,संग्राम नागणेविठ्ठल बिले,संजय जावळे,यश महामुनी,गणेश मोरे,समर्थ महामुनी,कमलेश माळी,राहुल बनसोडे,सौरभ मुढे,भारत नागणे,पांडुरंग कोंडुभैरी,प्रमोद महामुनी,सचिन साळुंखे,हर्षराज जावळे,स्वराज कलूबर्मे,कल्याण घुले,आदित्य राऊत,डॉ.राहुल शेजाळ,माणिक गुंगे,प्रकाश दिवसे,फारुख मुजावर,पांडुरंग नागणे,चंद्रकांत चेळेकर,प्रा.धनाजी गवळी,चंद्रकांत काकडे,प्रा. विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी सहभागी होते.
