प्राथमिक शिक्षण हाच यशस्वी जीवनाचा पाया - डॉ. बसवराज शिवपुजे साहेब, DYSP , मंगळवेढा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २२ जून, २०२६

प्राथमिक शिक्षण हाच यशस्वी जीवनाचा पाया - डॉ. बसवराज शिवपुजे साहेब, DYSP , मंगळवेढा



प्रतिनिधी 

न.पा. कन्या शाळा क्रं १, मंगळवेढा मध्ये नवोदय पूर्व परीक्षा तयारी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.

      नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ मंगळवेढा संचलित नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १, मंगळवेढा या शाळेमध्ये, प्रसन्न फाउंडेशन संचलित नवोदय पूर्वतयारी परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शनिवार दि . २० जून रोजी सकाळी ११ वाजताआयोजित करण्यात आला होता. हे सत्कार मंगळवेढ्याचे डी वाय एस पी मा . डॉ . बसवराज शिवपुजे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

         याप्रसंगी बोलताना डॉ . बसवराज शिवपुजे साहेब म्हणाले की, मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये म्हणजेच सरकारी शाळेमध्ये शिकलेलो आहे . मातृभाषेतून झालेले शिक्षण हे भविष्यामधील शिक्षणाचा पाया घडवते. शाळेमध्ये चांगला भारताचा नागरिक घडवण्यासाठी एक प्रकारची शिस्त लावली जाते आणि ती शिस्त लावण्याचे उत्तम काम आपल्या मराठी शाळांमध्ये खूप छान प्रकारे केले जाते. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये स्वयंशिस्त ही खूप महत्त्वाची आहे. शिक्षक वर्गात नसताना ज्यावेळेस आपण शिस्तीचे पालन करतो. मग भविष्यामध्ये आपण कोणत्याही कामांमध्ये स्वयंशिस्तीने प्रेरित होऊन यश मिळवू शकतो . शाळेतील गुणवत्तेचे व विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले . त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खूप छान मार्गदर्शन केले. 


      यावेळी पालक म्हणून बोलताना शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मा .सदस्या स्वाती बापूसाहेब यादव यांनी शाळेमध्ये घेतले गेलेले उपक्रम, व राबवले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम यासाठी शाळेतील सर्व शिक्षक खूप मेहनत घेतात. शाळेचे पालक व क्लास वन अधिकारी मा . श्री दत्तात्रय बुरुंगले साहेब यांनी देखील शाळेबद्दल गौरवोद्गार काढले . विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षकांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आपण देखील विद्यार्थ्यांचा दररोज घरी अभ्यास घेऊन त्यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांची हितगुज करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री मारुती दवले सर यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री संजय चेळेकर सर यांनी केले . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती आशा वाले मॅडम यांनी केले. 

      याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने हजर होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .दिग्विजयसिंग राजपूत , उपाध्यक्ष श्री अशोक भगत , श्री संत दामाजी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक व उत्तम निवेदक राजेंद्र जाधव सर व श्रीमती शीला अगसर मॅडम उपस्थित होते.

test banner