आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त वारी परिवाराची मंगळवेढा-माचणूर सायकल राईड. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २१ जून, २०२६

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त वारी परिवाराची मंगळवेढा-माचणूर सायकल राईड.


मंगळवेढा:-

प्रत्येक माणसाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी योगासन हाच उत्तम पर्याय आहे हा संदेश देण्यासाठी मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने २१ जुन आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मंगळवेढा-माचणूर सायकल राईड काढण्यात आली.


यावेळी सायकल चालवा इंधन वाचवा,योग करूया,निरोगी राहूया असा नारा देण्यात आला सध्या धावपळीच्या युगात योगा बरोबरच सायकलिंग करणे सुद्धा खूप आवश्यक आहे यासाठी मंगळवेढा-माचणूर-मंगळवेढा ३० किलोमीटर सायकल राईड काढन जनजागृती करण्यात आली.


यावेळी भीमा नदीच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात सिद्धेश्वर मंदिराच्या घाटावर योगासनाची प्रात्यक्षिके करुन योग दिन साजरा करण्यात आला.


यावेळी राईडमध्ये सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,रिदम शहा,राहुल सांवंजी,अविनाश जाधव,प्रफुल्ल सोमदळे,सचिन साळुंखे,विवेकानंद वाले, सिद्धेश्वर डोंगरे,चंद्रजीत शहा,कमलेश माळी,विष्णू भोसले,प्रा.विनायक कलुबर्मे आदी सहभागी होते.

test banner