मंगळवेढा प्रतिनिधी :
लोकमंगल बँकेने विद्याथ्यांच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप ही विद्यार्थ्यांच्या भावी यशासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रतिथयश उद्योजक श्री वैभव नागणे यांनी केले.
लोकमंगल बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या वतीने इयत्ता दहावी बारावी व विविध स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्यांचा गौरव उद्योजक श्री वैभव नागणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना उद्योजक वैभव नागणे म्हणाले की विद्यार्थ्यानी आपल्या आई वडीलांचा त्याग , परिश्रम याची जाणीव ठेऊन अभ्यासासाठी मेहनत करून सुयश प्राप्त करावे . माजी मंत्री तथा आमदार मा. सुभाषवापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकमंगल समुहाने महाराष्ट्रभर सहकाराचे जाळे विणले आहे. लोकमंगल संस्थांच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असून नवीन व्यवसायिक व उद्योजक निर्माण झाले आहेत . आ सुभाषबापू यांच्या कुशल नेतृत्वात लोकमंगल परिवाराने आर्थिक व शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चोफेर कामगिरी केलेली असून सोलापूर जिल्हयाच्या विकासात लोकमंगल समुहाचे योगदान मोठे आहे. याप्रसंगी त्यांनी लोकमंगल बँकेच्या प्रगतीचा व सामाजिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दत्तु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. धनाजी गवळी ,शिक्षक नेते संजय चेळेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुमित दुधाळ सई यादव प्रज्ञा जुंदळे समिक्षा पवार हर्षदा चव्हाण ज्ञानेश्वर लुगडे श्रावणी घुले सोमनाथ कांबळे समृद्धी चव्हाण आदींचा गौरव करण्यात आला.
यापवेळी मंगळवेढ्याचे सुपुत्र पियुष गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी प्रथम प्रयत्नात सीए परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पालक सुजाता आडसुळ चव्हाण व रूपाली गवळी यांनी लोकमंगल बँकेच्या प्रगतीचा व सामाजिक कार्याचा गौरव केला. सीए पियुष गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बँकेचे सांगोला शाखा व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांनी सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर करून शैक्षणिक कर्ज योजना सोलर कर्ज योजना सोने कर्ज तसेच शासकीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. कार्यकमाचे सुत्रसंचलन व मान्यवरांचे स्वागत शिवाजी दरेकर यांनी केले लोकमंगल पतसंस्थाचे शाखाअधिकारी संतोष कोरे यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास शाखेचे शाखाधिकारी सचिन पलंगे विनोद जगदाळे कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकम यशस्वी करण्यासाठी संतोष बावचे विशाल शिंदे आकाश धुमाळ प्रविण विरनाळे यांनी परिश्रम घेतले.

