मंगळवेढा नगरपरिषद येथे या कामा संदर्भात निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १७ जून, २०२६

मंगळवेढा नगरपरिषद येथे या कामा संदर्भात निवेदन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहरामध्ये भव्य अशा सांस्कृतिक भवनाचे काम रखडले आहे.या संदर्भात मंगळवेढा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष येताळा भगत यांना निवेदन देण्यात आले.


सांस्कृतिक कार्यक्रम,नाटके व इतर विविध कार्यक्रम घेण्यासाठी अल्प दरात सांस्कृतिक भवन उपलब्ध होत नाही.त्यामुळे कलावंत,सामान्य नागरिक,शाळा,हायस्कूल,विविध संस्था या सर्वांची गैरसोय होत आहे.


मंगळवेढा शहरातील सर्वात मोठ्या इमारतीचे काम रखडल्यामुळे सामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


तरी याची प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन उर्वरित निधी उपलब्ध करून देऊन त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे व उद्घाटन सोहळा करून सर्वांसाठी सांस्कृतिक भवन खुले करावे.अशी मागणी सदर निवेदनामध्ये करण्यात आली आहे.


या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना देण्यात आली.यावेळी सुभाष कदम,रमेश जोशी,मल्लय्या स्वामी,लक्ष्मण नागणे,यतीराज वाकळे,दिगंबर भगरे,संभाजी सलगर,राजेंद्र जाधव,अकबर मुलानी,चंगेजखान इनामदार,सय्यद इनामदार,लहू ढगे,अजय आदाटे,सतीश दत्तू,गणेश मेहरकर उपस्थित होते.

test banner